Friday 25 April 2014

धुळे आकाशवाणी केंद्र येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२३ वा जयंती उत्सव संपन्न

धुळे आकाशवाणी केंद्र येथे भारत रत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा  १२३ वा  जयंती उत्सव संपन्न झाला, त्या निमित्त येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, दिनांक १४एप्रिल २०१४रोजी येथील केंद्रातले स्थानिक कर्मचारी तथा अधिकारी यांनी   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदनकेले, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विजय दळवी  कार्यक्रम विभाग प्रमुख आकाशवाणी केंद्र धुळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय तसेच सामाजिक कायांचा उल्लेख आपल्या अध्यक्षीय भाषणात केला तांच्या भाषणात त्यांनी आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. कठीण प्रसंगांना तोंड देत डॉ. आंबेडकर यांनी शिक्षण घेतले आणि आपले उद्दिष्ट साध्य केले. आजच्या पिढीने डॉ. आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या शिकवणीनुसार वाटचाल करावी, असे आवाहन केले.  डॉ. आंबेडकर यांच्या शिकवणीची आज देशाला गरज असल्याचे सांगितले. डॉ. आंबेडकर यांनी `शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश दिला. त्यांचे तत्व आणि सिद्धांत आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
 त्या नंतर क्लार्यालायातील अधिकारी तथा कर्मचारी श्री. दौलत पवार, श्री. राजेंद्र कुमावत श्री. साहेबराव बहिरम श्री. यशवंत कवटे श्री. नागोनाथ मोरे याची भाषणे झाली. तसेच या कार्यक्रमाला श्री. राहुल गवळे, श्रीमती श्रद्धा पगारे,  श्रीमती जान्हवी देशपांडे,  श्रीमती पुनम सावंत, श्रीमती मेघाली चंद्रात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.

तसेच या कार्यक्रमाच्या समारोप प्रीत्यार्थ श्री. राजेश शेजवळे,  प्रसारण अधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले.

No comments:

Post a Comment